रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या चार दुकानांना मनपाकडून सील

Four shops sealed by municipality

प्रतिनिधी । लातूर: सातत्याने सूचना देऊनही काही व्यापारी व नागरिक रस्त्यावर , सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत आहेत. जिल्हाधिकारी जी . श्रीकांत व आयुक्त एम .डी. सिंह यांनी अंबेजोगाई रोडवर शनिवारी सायंकाळी पाहणी केली व त्यामध्ये कचरा टाकणाऱ्या चार दुकानांना सील करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्वच्छता विभागांनी 4 दुकाने सील केली .

लातूर शहर महानगरपालिका स्वच्छता विभागाच्या वतीने सध्या शहरांमध्ये स्वच्छतेचे स्वच्छतेविषयक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत शहरांमध्ये प्लास्टिक बंदी असूनही प्लास्टिक वापरणाऱ्या वर कारवाई करणे सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई करणे व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे जाळणे याची बंदी असतानाही जाणीवपूर्वक कचरा टाकणाऱ्या व्यापारी , नागरिक यांना वारंवार सूचना देऊनही पुन्हा पुन्हा त्याच घटना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, आयुक्त एम डी सिंह यांनी शनिवारी सायंकाळी अंबाजोगाई रोड वरील 4 दुकानांवर कारवाई केली. या दुकानांना याआदी सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही रस्त्यावर कचरा टाकणे दुभाजका मध्ये कचरा टाकणे असे प्रकार वारंवार होत असल्यामुळे स्वच्छता विभागाच्या वतीने ही दुकाने सील केली.

ली कॅफे, केतकी पावभाजी, श्री कृष्ण रिफ्रेशमेंट सेंटर व प्रियंका जनरल स्टोअर्स या दुकानांना सील करण्यात आले.

यावेळी सहाय्यक आयुक्त वसुधा फड , उज्ज्वला शिंदे , स्वच्छता निरीक्षक कलीम शेख , रवी कांबळे , अतिक्रमण विभाग प्रमुख शेख , उपस्थित होते .