मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटजवळ भरधाव कारचा धुमाकूळ, ४ जणांचा चिरडून मृत्यू

Mumbai Crawford Market Car Accident

मुंबई : मुंबईतील (Mumbai) क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market) परिसरात सोमवारी एका भरधाव कारने धुमाकूळ घालत अनेकांना चिरडलं. क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलच्या जवळ एका भरधाव कारने ८ जणांना चिरडलं असून यातील ४ जणांचा मृत्यू झाला. तर अन्य ४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. अचानक जनता हॉटेलच्या समोरील रोडवरून भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला. तिने हॉटेलसमोर उभा असलेल्या ८ जणांना उडवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

Mumbai: Speeding car rams into people sitting on road near Crawford Market,  around six injured | Mumbai News - Times of India

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER