कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढीची शक्यता

dearness allowance for employees

नवी दिल्‍ली : केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना लवकरच खूशखबर मिळणार. त्यांच्या महागाई भत्त्यात सरकार चार टक्क्यांनी वाढ करणार आहे. या घोषणेची केंद्रीय कर्मचारी आतुरतेने वाट पाहात होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. या घोषणेचा लाभ केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना होणार आहे.ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सची (AICPI) घोषणा कामगार मंत्रालयाने केली आहे. त्यामुळे आता महागाई भत्तादेखील वाढवून मिळेल, अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.

यावरूनच महागाई भत्त्याचा दर ठरवला जातो. एआयसीपीआयच्या आधारे प्रवास भत्त्यातही चार टक्क्यांनी वाढ होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचा फायदा कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झाली, तर प्रवास भत्त्यातही चार टक्के वाढ होईल. १ जुलै २०२० ते १ जानेवारी २०२१ पर्यंत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जाणार नाही.

एप्रिल २०२० मध्ये सरकारने महागाई भत्ता थांबवण्याची घोषणा केली होती. जून २०२१ पर्यंत महागाई भत्ता मिळणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले होते. सध्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता आणि डियरनेस रिलीफ मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सध्या १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. यात चार टक्के वाढल्यास, तो २१ टक्के होईल आणि प्रवास भत्ताही वाढेल.

यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना महागाईमुळे होणाऱ्या खर्चातील वाढ सोसता यावी, या उद्देशाने महागाई भत्ता दिला जातो. याची घोषणा वर्षांतून दोन वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात केली जाते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER