ठाण्यातील वेदांता रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू; चौकशीची घोषणा

Four Patients Died Due To Lack Of Oxygen

ठाणे : ठाण्यातील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी (Oxygen) चार कोरोनाबाधित (Corona) रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऑक्सिजन मिळाला नसल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील खाजगी वेदांता रुग्णालयातील हा प्रकार मनसेचे (MNS) पदाधिकारी संदीप पाचंगे यांनी उघडकीस आणला. त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली.

या प्रकरणाची सहा सदस्यीय समितीकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. एवढंच नाही तर भाजप आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनीही सकाळी वेदांता रुग्णालयाला भेट दिली. तसेच या घटनेची शल्यचिकित्सकांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान वेदांता रुग्णालय परिसरात रुग्णांचे नातेवाईक, मनसे आणि भाजपचे पदाधिकारी जमलेले असून पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज सकाळी ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

रुग्णालयातील ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं इतर ठिकाणाहून ऑक्सिजन मागवला होता. रुग्णालय प्रशासनानं हे चारही रुग्ण क्रिटिकल होते असं सांगितलं. त्यामुळे त्यांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाला आहे. जर ऑक्सिजनअभावी त्यांचा मृत्यू झाला असता तर एकाच वेळी अनेक रुग्ण दगावले असते. त्या वॉर्डमध्ये एकूण ३५ रुग्ण होते, असं सांगितलं आहे. तसेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना हेच सांगितलं. परंतु, आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यासाठी सहा सदस्यीस समितीची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सिव्हिल रुग्णालयाचे सर्जन अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांचाही या समितीत समावेश असणार आहे. जे या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button