
एमटी ब्यूरो
नाशिक : मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबाडे यांनी भाजपात प्रवेश करण्याला एक आठवडाही उलटला नसतांना आज परत मनसेच्या 4 नगरसेवकांनी सेनेत प्रवेश करून पक्षाला जोरदार धक्का दिला आहे.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या 4 नागरसेवकांसह ‘शेकाप’च्या एका माजी नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला.
गणेश चव्हाण, सुवर्णा मटाले, विजय ओव्हळ, शीतल भांबरे या चार मनसे नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
शेकापचे माजी नगरसेवक जे. टी. शिंदे यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. आतापर्यंत नाशिकमधील मनसेच्या 40 पैकी 25 नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकत वाढणार आहे.