सांगली जिल्ह्यात आज आणखी चौघे कोरोणा बाधित : जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी

Abhijit Chaudhary

सांगली : सांगली जिल्ह्यात 82 रुग्ण कोरोणा बाधित असून यामध्ये आज नवीन ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत उपचाराखाली 34 रुग्ण आहेत . यामध्ये आज चार रुग्ण नवीन पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत‌. आतापर्यंत 46 रुग्ण कोरोणामुक्त झाले असून यात आज कोरोणामुक्त झालेल्यांची संख्या ३ आहे.

जिल्ह्यात आजतागायत २ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे .आज कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांमध्ये बनपुरी तालुका आटपाडी येथील पंधरा वर्ष तरुण समाविष्ट असून तो मुंबईहून आला आहे. तर खिरवडे तालुका शिराळा येथील मुंबईहून आलेल्या 56 वर्षे पुरुषाचाही यात समावेश आहे . काल नागोळे येथे कोरोणा बाधित असणाऱ्या रुग्णाचा 22 वर्षीय मुलगाही कोरोणा बाधित झाला आहे. धारावी ते मालगाव बस प्रवास केलेल्या सर्व 22 लोकांना क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांचे स्वाब घेण्यात आले होते. या मधील 20 जण कोरोना निगेटिव्ह असून एक 75 वर्षीय महिला कोरोणा बाधित ठरली आहे. तर एकाचा अहवाल प्रलंबित आहे . पॉझिटिव्ह पैकी सद्यस्थितीत तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर आज कोरणामुक्त झालेल्यांमध्ये भिकवडी खुर्द च्या दोन तर अंकले जत येथील एकाचा समावेश आहे.

लक्ष्मीनगर येथील कोरोणा बाधिताचा अहवाल निगेटिव्ह आले होते .तथापि त्याचा आज पहाटे मृत्यू झाला आहे . तर विटा येथील संशयित मृताचा कोरोणा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER