अकोल्यात ट्रक-रिक्षाच्या भीषण अपघातात चार मजुरांचा मृत्यू

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील टेंभुर्णा फाट्याजवळ मजुरांच्या रिक्षाला ट्रकने जबर धडक दिल्याने चार मजुरांचा जागीच जागीच मृत्यू झाला. तर सहा मजूर गंभीर जखमी झालेत. बुलढाणा येथून हे मजूर कामासाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येते जात असताना आज (बुधवार) सकाळी हा अपघात झाला. ट्रकचालक फरार झाला असून पाेलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,’ हे सर्व मजूर रिक्षाने खामगाव मार्गे बाळापूर मध्ये येत असताना समोरून येणाऱ्या ट्रॅकने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. यानंतर रिक्षा पलटी झाल्याने चार मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. खामगाव पाेलिसांनी वेळीच धाव घेत जखमींना उपचारार्थ खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान,’ अपघातातील जखमींची आेळख पटवणे सुरू आहे.