एनआयएकडून परमबीर सिंग यांची चार तास चौकशी, ९ प्रश्न विचारल्याची शक्यता

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात (Sachin waze case) एनआयएने आज सकाळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलवले होते. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. सचिन वाझेंची नियुक्ती आणि इतर विषयांवर परमबीर सिंह (Parambir Singh) यांना प्रश्न विचारण्यात आल्याची दात शक्यता वर्तवली जात आहे.

परमबीर सिंह यांना कोणते प्रश्न विचारण्याची शक्यता?

  • १) परमबीर सिंह आयुक्त झाल्यानंतर सचिन वाझे यांची मुंबई पोलिस दलात नियुक्ती कुठल्या आधारावर करण्यात आली?
  • २) सचिन वाझेंना कुणाच्या सांगण्यावरुन पोलिस दलात घेतले?
  • ३) सर्व महत्त्वाचे गुन्हे वाझेंनाच का? इतर वरिष्ठ अधिकारी असताना वाझेंनाच अँटिलिया स्फोटक प्रकरण तपासासाठी का दिले?
  • ४) या संपूर्ण गुन्ह्यात वाझेंचा सहभाग निश्चित झाल्यानंतरही तातडीने केस का वर्ग केली नाही, चालढकलपणा का केला?
  • ६) अटकेपूर्वी वाझे परमबीर सिंग यांना रिपोर्टिंग करत होते. त्यावेळी तासनतास परमबीर यांची वाझेंसोबत बैठक होत होती. या बैठकीत वाझे काय सांगायचे?
  • ७) गुन्ह्यात सचिन वाझेंचा सहभाग माहिती होता का?
  • ७) जैश उल हिंद दहशतवाद संघटनेची तपासणी खासगी सायबर संस्थेकडून का करण्यात आली?
  • ८) गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या पोलिस आयुक्तालयात कशा आल्या?
  • ९) सचिन वाझे इतरांपेक्षा जवळचे का?

दरम्यान, मनसुख हिरेन हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेंबाबत धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांना पुन्हा शेवट घेण्यासाठी परमवीर सिंग यांच्या उपस्थित बैठक झाली होती.

तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा धक्कादाक खुलासा अहवालात करण्यात आला आहे. वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button