सुरक्षिततेच्या दृष्टीने चार दिवसांत ‘ते’ जहाज हलवण्याचे बंदर विभागाचे आदेश

सुरक्षिततेच्या दृष्टीने चार दिवसांत 'ते' जहाज हलवण्याचे बंदर विभागाचे आदेश

रत्नागिरी(प्रतिनिधी) :  चक्रीवादळात मिऱ्या येथे अडकलेल्या जहाजातून 25 हजार लिटर डिझेल काढण्यात एजन्सीला यश आले असले तरीही किनाऱ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येत्या चार दिवसात ते जहाज काढण्याच्या सूचना प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

मिऱ्या येथे जहाज अडकून आता एक महिना झाला. हे जहाज किनाऱ्यावर रुतल्यामुळे बंधाऱ्यावर आपटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जहाजामधील धोकादायक असलेले ऑईल आणि 25 हजार लिटर डिझेल काढण्यात एजन्सीला यश आले आहे. मात्र किनाऱ्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येत्या चार दिवसामध्ये जहाज काढा, असा अल्टीमेटम प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी जहाज एजन्सीला दिला आहे. जहाज वाचविण्याच्यादृष्टीने जोरदार मोहीम सुरू झाली आहे. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन) मंचलवार यांनी जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी यांना घेऊन जहाजावरील जळके ऑइल काढण्याची मोहित हाती घेतली.

ऑईल गळती होऊन किनाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ते टाळण्यासाठी प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला नोटिस बजावली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑइल काढण्यास सुरवात झाली. पंप बसवून पाइपद्वारे किनाऱ्यावर मोठे बॅरल ठेवून त्यामध्ये हे ऑइल काढण्यात आले. 30 ते 35 बॅरल म्हणजे सुमारे साडेसहा ते सात हजार लिटर ऑइल काढण्यात आले. त्यानंतर लगोलग जहाजामधील सुमारे 25 हजार लिटर डिझेलसाठा सुरक्षित काढण्यात आला आहे. किनारा सुरक्षेच्यादृष्टीने बंदर विभागाने एजन्सीला चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER