तुर्भेतील चार भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर

Shivsena_Bjp

नवी मुंबई : तुर्भे येथील भाजपाच्या नगरसेवकांनी ‘कमळा’ची साथ सोडत शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतल्यामुळे नवी मुंबईत भाजपाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित चारही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मनसेचा वर्धापन दिन 9 मार्च रोजी नवी मुंबईत

काही दिवसांपूर्वी तुर्भेतील भाजपाच्या चार नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केल्यानंतर भाजपाला गळती लागल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केलेली असताना भाजपाला धक्का बसला आहे.

स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांच्या पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांनी राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. अलीकडेच सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभाला शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळीच कुलकर्णी शिवसेनेत जाण्याविषयीची चर्चा सुरू झाली होती.