तळोजा : पती –पत्नीने मुलांची हत्त्या करून केली आत्महत्त्या

Dead Body

पनवेल : तळोजा फेज वनमधील सेक्टर ९ येथील शिव कॉर्नर सोसायटीमध्ये एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील चौघांचे प्रेत सापडले आहेत.

मृतांमध्ये पती – पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा समावेश आहे. पती – पत्नीने मुलांची हत्त्या केल्यानंतर गळफास लावून आत्महत्त्या केली.

हे कुटुंब नितेशकुमार उपाध्याय यांचे आहे. सुमारे ८ महिन्यांपूर्वी हे कुटुंब येथे रहायला आहे. २ महिन्यांपासून त्यांनी फ्लॅटचे भाडे दिलेले नाही. जवळपास त्याच सुमारापासून या फ्लॅटचे दार उघडले नाही.

ही बातमी पण वाचा : प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची गोळी घालून हत्या

हे कुटुंब भाड्याने या फ्लॅटमध्ये रहात होते. गेल्या काही दिवसांपासून फ्लॅटचा दरवाजा उघडला नव्हता. आज पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा ही धक्कादायक घटना उघड झाली. सर्व प्रेतं सडली आहेत. घटनास्थळी आत्महत्त्येबाबत लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. आपल्या आत्महत्येस कुणालाही दोषी धरू नये, असा उल्लेख करण्यात आला आहे.


Web Title : Four bodies were found in a flat

Maharashtra Today : Online Marathi News Portal