चाळीस वर्ष उलटून गेल्यानंतरही ‘ग्लोक’ पिस्तोलोची आजही कुणी बरोबरी करू शकत नाही!

Glock Pistol - Maharashtra Today

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर सर्वच राष्ट्रांना ही कल्पना आली की हत्यारांना आता जास्तीजास्त आधुनिक बनवावं लागले. त्यांनी यावर संशोधन सुरु केलं. दिवसेंदिवस हत्यारं अपग्रेड होत होती. जुनी हत्यारं बेकार पडत होती. असंच काहीसं ऑस्ट्रीया सेनेसोबत झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर एक जबरदस्त पिस्तोल बनवण्यावर तिथं संशोधन सुरु होतं. बराच मोठा काळ तिथं संशोधन सुरु होतं. मोठा वेळ याला गेला होता. परंतू हवी तशी पिस्तोल त्यांना मिळाली नव्हती. तेव्हा तिथल्या एका सैन्यअधिकाऱ्याच्या मनात बंदूक बनवण्याचा विचार आला. याआधी जगाच्या पाठीवर कुठचं आधुनिक हत्यार बनले नव्हते.

यात ‘गॅस्टन ग्लोक’ (Gaston Glock) यांनी पुढाकार घेतला. त्यांनी याआधी सैन्यानं चाकू आणि गोळ्या ठेवण्यासाठी विशेष बेल्ट बनवले होते. परंतू ग्लोक हत्यारं बनवत नव्हते. त्यांना या व्यापारात उतरायचं होतं. त्यांनी काही तज्ञांना एकत्रित केलं. आणि एक अशी पिस्तूल बनवली जी प्रत्येक ठिकाणी वापरात आणता येईल. गॅस्टन यांना पॉलीमरचं विशेष ज्ञान होतं. त्यांनी विचार केला होता की त्यांची बंदूक पॉलीमरची असेल. त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर अनेकांनी सुरुवातीला शंका उपस्थीत केली परंतू त्यांनी हा निर्णय योग्य असल्याचं शेवटी सिद्ध केलंच. १९७९ साली तीन महिन्यांच्या आत ९ एम.एम. ची ग्लोक पिस्तूल (Glock Pistol) बनून तयार झाली. यानंतर त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. ग्लोक १७ बनवणाऱ्या टीमला हा अंदाजा नव्हता की त्यांनी काय चीज बनवली आहे.

अमेरिकेपर्यंत पोहचली ग्लोक

गॅस्टन ग्लोक यांनी बनवलेली ग्लोक १७ ही पिस्तूल ऑस्ट्रीयाच्या सैन्याला दिल्यानंतर सैन्यअधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला असली पिस्तूल याआधी त्यांनी पाहिली नव्हती. याची विशेषता ही होती की यात १७ गोळ्या फिट करणं शक्य होतं. पॉलीमरची बनवाट असल्यामुळं ही बंदूक वापरण्याचे बरेच फायदे झाले. प्रत्येक वातावरणात वेगवेगळ्या तापमानात जगाच्या कानाकोपऱ्यात ही पिस्तूल अशीच काम करायची. शिवाय निशाणाही अचूक बसायचा. थोड्याच कालावधीत या पिस्तूलीवर अमेरिकेची नजर पडली. यानंतर १९८८ ला जगप्रसिद्ध ग्लोक गन अमेरिकेच्या दिशेनं निघाली.

अमेरिकेच्या गल्ली गल्लीत ड्रग्जचा कारभार त्याकाळी वाढला होता. अशा वेळी गुन्हेगारांशी लढण्यासाठी पोलिसांना एक प्रभावी पिस्तूल गरजेची होती. याशिवाय ती एक ‘इजी टू टर्न’ बंदूक होती. एका दिवसाच्या आत लोकांना ती चालवण्यासंबंधीच ज्ञान व्हायचं. बदलत्या वेळेसोबत जगातली सर्वात प्रभावी पिस्तूल असण्याचा मान ग्लोकनं कामावला. इतकच नाही तर हॉलीवूडच्या अनेक सिनेमांमध्ये ही पिस्तूल दिसू लागली.

ग्लोकमध्ये ९ एम.एम. च्या १७ गोळ्या ठेवता येतात. शिवाय याच्याशिवाय इतर कोणतीच पिस्तूल हिच्याशी मुकाबला करु शकत नाही. बदलत्या काळासोबत यात बरेच बदल करण्यात आले. ग्लोक १७ मध्ये लेजर आणि स्कोपही नंतरच्या काळात फीट करण्यात आले. हिच्यावर बरेच प्रयोग नंतरच्या काळात करण्यात आले. हेलिकॉप्टरमधून ही बंदूक खाली फेकण्यात आली. चिखलात ठेवण्यात आली. मातीत पुरण्यात आली. बर्फात ठेवण्यात आली. अशा सर्व चाचण्या केल्यानंतरही पुढच्याच क्षणी बंदूक तितक्याच क्षमतेनं चाललायची.

ग्लोक पिस्तूल खराब होणं जवळपास अशक्य मानलं जातं. आजही अनेक राष्ट्रातील पोलिस आणि सैन्याधिकारी ही बंदूक वापरतात. म्हणूनच हिला नंबर १ पिस्तूल म्हणून संबोधलं जातं. म्हणून ग्लोक १७ एक जबरदस्त पिस्तूल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button