सांगली सायकल बँकेतून चाळीस सायकलीचे वाटप.

सांगली : माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी सांगलीत सायकल बँक या उपक‘माची सुरुवात श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी सुमारे चाळीस सायकलींचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले. काही दिव्यांगांना मोफत श्रवणयंत्रे, व्हिलचेअर वाटण्यात आल्या. नाममात्र शुल्कांमध्ये रुग्णसेवेसाठी आवश्यक असणार्‍या वस्तूही उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सांगलीत कृष्णानदीकाठी असलेल्या मदन पाटील यांच्या समाधीस्थळावर सोमवारी मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यावेळी श्रीमती जयश्री पाटील, कॉंग‘ेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेशउपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, युवा नेते डॉ. जितेश कदम, मोनिका कदम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर , जिल्हा बँकेचे संचालक डॉ. सिकंदर जमादार, माजी महापौर किशोर शहा, मदन पाटील युवामंचचे अध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील आदी उपस्थित होते.

महापालिकेत महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, उत्तम साखळकर यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, युवानेते अमर निंबाळकर, वैभव वाघमारे, सर्जेराव काळुसे आदी उपस्थित होते.

सायकल बँक संकल्पनेची माहिती आनंदा लेंगरे यांनी दिली. यावेळी 40 सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले. मिरजेतील कर्णबधीर शाळेतील 20 विद्यार्थाना श्रवणयंत्र वाटप करण्याचा उपक‘म जितेश कदम यांच्याहस्ते पार पडला. संयोजन युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील, शहराध्यक्ष शीतल पाटील, अमोल झांबरे, संजय कांबळे आदींसह कार्यकर्त्यांनी केले. कय्युम पटवेगार यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.