दुर्गप्रेमीला स्टंटबाजी पडली महागात; ग्रामस्थांनी दिला चोप

कोल्हापूर : रांगणा किल्ल्यावर मोबाईल स्टंटसाठी (mobile stunts at Rangana Fort) निर्दयपणे मारहाण करणाऱ्या चौघांना पकडून नागरिकांनी त्यांना चांगलेच चोपले. नागरिकांनी त्या चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून  भुदरगड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हृषीकेश  भरत माने, प्रसाद शिवाजी माने (दोघे रा. कोगनोळी), उमेश राजाराम माने (रा. वडणगे), विजय नामदेव गुरव (रा. शिरगाव, करवीर) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान या दोघांनी कोकणातील एका तरुणास दारू पिल्याच्या कारणावरून निर्दयपणे मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या निर्दयी मारहाण विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

२६ जानेवारीला रांगणा किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या गारगोटीतील एका युवकाला तंबाखू खाल्याच्या कारणावरून माफी मागत नाक घासण्यास सांगितले. यानंतर त्या युवकाला काठीने बेदम मारहाण केली. यावेळी त्याच्या डाव्या हाताचे हाड फॅक्चर झाले तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. मारहाणीचे मोबाईलवरून शूटिंग करत व्हायरल करून स्टंटबाजी केली.

दरम्यान युवकास निर्दयीपणे केलेल्या मारहाणीची माहिती गारगोटी शहरात वाऱ्यासारखी पसरली. निर्दयी मारहाणीचे शूटिंग पाहून संतप्त झालेले तरुण मारहाण करणाऱ्या त्या चौघांची वाट पाहात बसले होते. मारहाण करणारे हे चार जण मंगळवारी रात्री आपल्या गावी परत जात असताना त्यांना वाटेत अडवून संतप्त जमावाने बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले व त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER