वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेट कर्णधार व्हिव रिचर्ड्स यांनी मानले मोदींचे आभार

PM Narendra Modi - Vivian Richards - Maharashtra Today

मुंबई : कोरोनासाथीच्या विरोधातील लढाईमध्ये भारताची भूमिका जागतिक पातळीवर महत्त्वाची ठरते आहे. भारताने ‘मैत्री अभियाना’च्या अंतर्गत अनेक देशांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा केला आहे. मागच्या आठवड्यात वेस्ट इंडिज बेटावरच्या अ‍ॅण्टिग्वा, बार्बोडस, सेंट किट्स आणि नेविस, सेंट विंसेन्ट, सुरीनाम यासारख्या कॅरिकॉम देशांना लस रवाना केली. याबद्दल वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार व्हिवियन रिचर्ड्स (Vivian Richards), रिची रिचर्डसन (Richie Richardson) आणि जिमी अ‍ॅडम्स (Jimmy Adams) यांनी भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. ‘डीडी न्यूज’ने त्यांच्या ट्विटर हँडलवरुन याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘भारताने आम्हाला कोरोना वॅक्सीनचा पुरवठा केला, त्यामुळे आमचे संबंध आणखी घट्ट झाले आहेत,’ अशी भावना रिचर्ड्स यांनी व्यक्त केली आहे. भारताने लसीचे ४० हजार डोस पाठवले आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे संचालक जिमी अ‍ॅडम्स यांनी भारत सरकारच्या या अभियानामुळे कॅरिकॉम देशांना खूप फायदा होईल. मी जमेका देशवासियांच्यावतीने मोदींचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, कॅरीकॉम हा २० देशांचा समूह आहे. या समुहाची लोकसंख्या १. ६ कोटी आहे. भारताने याआधी मेैत्री अभियानाच्या अंतर्गत भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका या देशांना कोरोना लसीचा पुरवठा केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER