
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंगवर सुरू आहे. आता माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते (Subodh Mohite) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची त्यांनी भेट घेतली असून, मोहितेंच्या पक्ष प्रवेशावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत .
विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळेच विदर्भात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठीच मोहितेंना प्रवेश देण्यात येणार असल्याचे बोलले जाते .
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध तोडले. मोहिते यांनी शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांवर नवीन संघटना स्थापन करण्याची घोषणा केली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला