माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनाने निधन

Former Union Minister Dilip Gandhi dies in Corona

अहमदनगर : माजी केंद्रीयमंत्री, अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी (Former Union Minister Dilip Gandhi) (६९) यांचे आज (१७ मार्च रोजी) पहाटे कोरोनामुळे(Corona) दिल्लीत निधन (pass Away)झाले. नगर सारख्या प्रस्थापित साखर सम्राटांच्या जिल्ह्यात त्यांनी राजकीय बस्तान बसवले आणि टिकवले होते. दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले.

दिलीप गांधी यांची राजकीय कारकीर्द मनपा नगरसेवक म्हणून सुरू झाली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीचे नेते झाले. १९८५ मध्ये अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपाच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

अहमदनगर मतदारसंघातून ते १९९९ ला लोकसभेवर निवडून गेले. केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाचे मंत्री झालेत. २९ जानेवारी २००३ ते १५ मार्च २००४ या कालावधीत ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री होते. राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख यांनी त्यांना २००४ मध्ये पराभूत केले.

मोदी लाटेत मोठा विजय

२००९ मध्ये दिलीप गांधी पुन्हा अहमदनगरमधून लोकसभेवर निवडून गेले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी पुन्हा निवडून आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने संपूर्ण देशभरात मोठा विजय मिळवला होता.

२०१९ ला तिकीट नाही

दिलीप गांधींचे तिकीट कापून २०१९ ला भाजपाने राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंना उमेदवारी दिली. सुजय विजयी झालेत. पण, यामुळे दिलीप गांधी नाराज झाले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांधींची भेट घेऊन मनोमीलन केल्याचे सांगितले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER