माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन

Vishnu Savara

पालघर : संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले व माजी आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सवरा (Vishnu Savara) यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी नऊ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी 1 वाजता वाडा येथील शिदेश्वर नदीकाठी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते विष्णू सवरा यांचे बुधवारी सायंकाळी वयाच्या 72 वर्षी निधन झाले. संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले आणि आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांना दोन वर्षांपासून यकृताच्या आजाराने ग्रासले होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सवरा यांच्या निधनाने संवेदनशील, कर्तव्यदक्ष नेता हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. उद्या सवरा यांचे पार्थिव सकाळी सहा वाजता त्याच्या उत्कर्षनगर येथील निवासस्थानी आणण्यात येणार असून, सकाळी नऊ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता वाडा येथील शिदेश्वर नदीकाठी स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

विष्णू सवरा हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते जोडलेले होते. 1980मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशकर्ते झाले. 1980 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने वाडा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 1985च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून पुन्हा वाडा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांचा निसटता पराभव झाला होता. दोनदा पराभव झाल्यानंतरही सन 1995 च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 1999 रोजी आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला. अवघे सहा महिने मिळालेल्या मंत्रीपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER