क्रिकेटर सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका

sourav ganguly

मुंबई :- टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा (BCCI) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे . उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे.

माहितीनुसार , गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं. यानंतर रुग्णालयाकडून गांगुलीवर अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात येणार आहे. डॉक्टर सरोज मंडल तसेच इतर 3 डॉक्टर हे गांगुलीवर अँजियोप्लास्टी करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER