सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश एम. वाय. इक्बाल यांचे निधन

M. Y Iqbal passed away - Maharashtra Today

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. वाय. इक्बाल यांचे गुरुग्राम येथील मेदान्त इस्पितळात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. शुक्रवारी दुपारी दिल्लीतील निजामुद्दीन येथील पंच पीरन कबरस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला.

न्या. इक्बाल २४ डिसेंबर, २०१२ ते १२ फेब्रुवारी, २०१६ अशी सुमारे चार वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. त्यांनी रावी-व्यास पाणीवाटप न्यायाधिकरणाचे सदस्य म्हणूनही काम केले. रांची येथे २१ वर्षे वकिली केल्यानंतर ते आधी पाटणा व नंतर झारखंड असे मिळून एकूण १४ वर्षे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. जून २०१० ते डिसेंबर, २०१२ अशी दोन वर्षे ते मद्रास उच्च न्याायलयाचे मुख्य न्यायाधीश होते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button