राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन; नितीन गडकरींनी वाहिली श्रद्धांजली

Vaidya & Nitin Gadkari

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Former spokesperson of RSS Ma Go Vaidya Passes Away) मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. १९६६ पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणार्‍या मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. १९४८ साली गांधीहत्येनंतर संघावरबंदी आली त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ‘सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक मा. गो. वैद्य यांनी लिहिले आहे, ते नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्याची ई-आवृत्ती ६ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झाली होती. १९७८ साली मा. गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. त्या वेळची त्यांची कारकीर्दही उल्लेखनीय राहिली.  वैद्य यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली.

पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला.

मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले. खरे तर बाबुरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता; परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती- अशी श्रद्धांजली नितीन गडकरींनी वाहिली. .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER