शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत आता रंगत भरत चालली असून ही लढत तिहेरी होणार आहे. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवणार असल्याने नगराध्यक्ष निवडणुकीला शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकले असून त्यामुळे या निवडणुकीला वेगळाच रंग चढला आहे.

शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आज त्यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. मिलिंद कीर गुरुवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.