शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाचा मनसेत प्रवेश; लगेच जिल्हाध्यक्ष नियुक्त!

Prakash Kaudge - Raj Thackeray

नांदेड : शिवसेनेचे (Shiv Sena) नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे (Prakash Kaudge Join MNS) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेत (MNS) प्रवेश केला. राज ठाकरे यांनी लगेच त्यांच्यावर मनसे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली.

नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या कौडगे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोडली आहे. त्यांच्या मनसेत प्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

प्रकाश कौडगे नांदेड जिल्ह्यातील जनतेशी जुळलेले नेते आहेत. नांदेडच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा चांगला दबदबा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट दिले नाही. मिळाले नाही त्यामुळे नाराज प्रकाश कौडगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्या बंडखोरीचा मोठा फटका शिवसेनेला बसला.

कौडगे मनसेत जातील, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. काही महिन्यांपूर्वी माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी मनसेत प्रवेश केला तेव्हा कौडगेदेखील त्यांच्यासोबत मनसेत प्रवेश करतील अशी चर्चा होती. आज त्यांचा मनसेत प्रवेश झाला.

प्रकाश कौडगे यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांनी कौडगे यांना नांदेड जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER