
कल्याण :- कोरोनाच्या (Corona) काळात धुमाकूळ घालत शिवसेनेचे (Shiv Sena) माजी नगरसेवक नवीन गवळी (Navin Gavli) यांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आले. रात्री १२ वाजेपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शेकडो समर्थक जमले. दोन गटात हाणामारी झाली. एका गटाने गोळीबार केला. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात हा धुमाकूळ झाला. या गोंधळात सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. नवीन गवळी यांच्या कार्यालयासमोर त्यांचे काही समर्थक उभे असताना निलेश गवळी आणि महेश भोईर हे दोघे तिथे आलेत. निलेश गवळीचे काही महिन्यापूर्वी जगदीश राठोड या तरुणासोबत भांडण झाले होते. निलेश जगदीश यांच्यात चर्चा सुरु असताना निलेश सोबत असलेल्या महेश भोईर यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. नंतर हाणामारी सुरू झाली. महेशने लायसन्स रिव्हॉल्वर काढली आणि नशेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. एक गोळी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला लागली. गोळीच्या आवाजाने परिसरांमध्ये गोंधळ उडाला, लोकांमध्ये पळापळ सुरू झाली. सुदैवाने गोळीबारात जिवीत हानी झाली नाही.
कल्याण कोळशेवाडी पोलीसानी या प्रकरणी गुन्हे दाखल करून फायरिग करणारा महेश भोइर याला ताब्यात घेतले. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.