माजी रणजीपटूचा करोनाने घेतला बळी

उमेश मनोहर दास्ताने

सोलापूर :- सोलापुरातील (Solapur) माजी रणजी क्रिकेटपटू उमेश मनोहर दास्ताने (वय ६४) यांचे काल रात्री करोना (Coronavirus) संसर्गामुळे निधन झाले. मध्य रेल्वेतून मुख्य तिकिट निरीक्षकपदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.

उमेश दास्ताने यांनी १०७७-७८ साली महाराष्ट्र विरूध्द गुजरात रणजी क्रिकेट (Ranji Trophy) सामन्यात सर्वप्रथम सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी पंधरा रणजी सामने खेळले होते. उत्कृष्ट फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी ते प्रसिध्द होते. रणजीनंतर त्यांनी रेल्वे क्रिकेट संघाकडून खेळायला सुरूवात केली. भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. चार वर्षापूर्वी ते रेल्वेच्या नोकरीतून निवृत्त झाले होते. पंधरा दिवसांपूर्वी दास्ताने यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. उपचार सुरू असतानाच अखेर त्यांचे प्राण गमावले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER