धर्मा प्रॉडक्शनचा माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक

Kshitij Prasad

मुंबई : बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात शनिवारी मुंबईच्या एनसीबी टीमने बॉलिवूडशी संबंधित क्षितिज प्रसाद याला अटक केली. क्षितिज हा धर्मा प्रॉडक्शनमध्ये कार्यकारी निर्माता म्हणून काम करत होता. एनसीबीने काही दिवसांपूर्वी त्याची चौकशी केली होती. क्षितिज एका ड्रग डीलरकडून ड्रग्ज घेत होता, असा आरोप आहे.

ड्रग पेडलर्ससह फोटो
क्षितिज प्रसाद एका ड्रग पेडलरसोबत उभा असल्याचा फोटो सापडला आहे. ड्रग्जच्या संबंधात हे छायाचित्र क्षितिज प्रसाद याच्याविरुद्ध सर्वांत मोठा पुरावा मानले जाते. हा ड्रग पेडलर अंकुश अरेना आहे. एनसीबीने चौकशी व पुरावे मिळाल्यानंतरच क्षितिजला अटक केली. क्षितिजच्या घरी होणाऱ्या सर्व कार्यक्रम आणि पार्टीत अंकुश हा ड्रग पेडलर सामील होत असे. क्षितिज प्रसाद हा करण जोहरच्या अगदी जवळचा आहे.

क्षितिजशी जवळीक नाही – करण जोहर
दरम्यान, करण जोहरने क्षितिजबद्दल माहिती देण्यास नकार दिला. क्षितिज एका प्रोजेक्टसाठी माझ्या कंपनीशी संबंधित होता; पण तो जवळचा नाही, असे त्याने जबाबात म्हटले आहे. करणने सोशल मीडियावर पोस्ट केले की, २०१९ मध्ये झालेल्या पार्टीबद्दल त्याने आधीच चर्चा केली आहे. त्याने ड्रग्ज घेतले नाही किंवा ड्रग पार्टीही केली नाही. काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली एक कथित ड्रग्ज पार्टी एनसीबी रडारवर आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER