माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात; रुग्णालयातून घरी परतले

Dr. Manmohan Singh

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांनी कोरोनावर (Corona) मात केली आहे. गुरुवारी सकाळी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठवण्यात आले. वयाच्या ८८ व्या वर्षातही त्यांनी कोरोना संसर्गावरील उपचाराला योग्य प्रतिसाद दिला आणि ठणठणीत होऊन ते घरी परतले. विविध व्याधींचा त्रास असतानाही त्यांनी विषाणूचा मुकाबला करीत देशवासीयांचे मनोबल वाढवणारे उत्तम उदाहरण उभे केले आहे. गेल्या १९ एप्रिलला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. विशेष म्हणजे मनमोहन सिंग यांनी कोरोना लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत.

१० दिवसांपूर्वी त्यांना हलकी लक्षणे दिसू लागली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता खबरदारी म्हणून त्यांची कोरोना चाचणी केली होती. गेल्या वर्षीही मे महिन्यात देशात कोरोना महामारीची चिंता वाढली असतानाच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यावेळी त्यांना औषधांचे रिअ‍ॅक्शन झाले होते. तसेच तापही आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. त्यावेळीही त्यांनी धैर्याने आजारपणावर मात केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button