माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटरवर

Pranab Mukherjee

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांची कोरोनाची (Corona) चाचणी काल पॉझिटिव्ह आली. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट करून सांगितले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर कोरोनाचेही उपचार सुरूच होते. मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते. आज त्यांच्या प्रकृतीचे वृत्त कळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची मुलगी श्रर्मिष्ठा मुखर्जी यांच्याकडे चौकशी केली. ते लवकर बरे व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER