माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात

Pranab Mukherjee

नवी दिल्ली : भारताचे(India) माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) कोमात गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झाली नाही. ते सध्या जीवनरक्षा प्रणालीवर आहेत, अशी माहिती लष्कराच्या रुग्णालयाने दिली.

एका वृत्तसंस्थेने याविषयी ट्विट करून माहिती दिली आहे. १० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. त्याच्या एक दिवस आधी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेले असल्याचे रुग्णालयाने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER