राष्ट्रपती राजवट लागू करा ! ‘त्या’ अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

Former-officer-Madan-Sharma-daughter-demand-Implement-presidential-rule-696x364.jpg

मुंबई : कांदिवली येथे राहणारे नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांचे (CM Uddhav Thackeray) एक कार्टून ‘फॉरवर्ड’ केल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. त्या अधिकाऱ्याची कन्या शीला हिने राज्यात राष्ट्रपती राजवट (President rule) लागू करण्याची मागणी केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.

शिवसैनिकांनीच माझ्या वडिलांना मारहाण केली; त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी शीला यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की – मारहाणीच्या घटनेनंतर पोलीस घरी आले आणि वडिलांना सोबत येण्यासाठी जबरदस्ती केली. आम्ही हल्ल्याप्रकरणी एफआरआय नोंदवला आहे. राज्यात माणुसकी नावाची गोष्टच उरलेली नाही.

त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी त्यांनी केली. भाजपाचे कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली. या घटनेनंतर पोलिसांनी शिवसेनेचे कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तीन जणांना अटक

शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. यानंतर कमलेश कदम नावाच्या व्यक्तीचा मला फोन आला. त्यांनी माझे नाव आणि पत्ता विचारला. दुपारी ते लोक बिल्डिंग खाली आले, मला खाली बोलावले.  गेटवर ८ ते १० जणांनी मला बेदम मारहाण केली. या प्रकरणी कमलेश कदमसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी केली ठाकरे सरकारवर टीका

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत ट्विटरवरून ठाकरे सरकारवर टीका केली. ही घटना अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. केवळ व्हॉट्सअपवर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकाऱ्याला या गुंडांनी मारले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशा घटना रोखल्या पाहिजेत. या गुंडांवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी.

ही बातमी पण वाचा:- शिवसेनेचं ओझं कधीपर्यंत सहन करणार’, काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER