अखेर माजी खासदार संजय काकडे यांना अटक!

Sanjay Kakade

पुणे : माजी खासदार संजय काकडे (MP Sanjay Kakade )यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे कारागृहातून सुटल्यानंतर शेकडो समर्थकांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रॅली काढली (Rally on Mumbai-Pune Express)होती. त्यात वाहनांचासेखील समावेश होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी दिली आहे.

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे यांनी मिरवणूक काढली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर काढलेल्या या मिरवणुकीत शेकडो कार होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गजानन मारणेसह इतरांवर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात आज संजय काकडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर सकाळी पोलिसांनी काकडे यांना अटक केली. यापूर्वीही काकडे यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्येही काकडे यांना सातारा पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, संजय काकडे यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मेहुण्याला धमकावल्याप्रकरणी काकडेंनी पत्नी उषा काकडे यांना चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button