माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार संभाजीराव काकडे (Sambhajirao Kakade) उर्फ लाला यांचे आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी संभाजीराव काकडे यांची ओळख होती. १९७१ साली विधान परिषदेवर पहिल्यांदा त्यांची निवड झाली होती. तर १९७७ मध्ये जनता लाटेत बारामती मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतरही एकदा पोटनिवडणुकीत त्याच मतदार संघातून ते विजयी झाले होते. जनता पक्ष तसेच जनता दलाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

जनता दलाचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक शरद पवार पाटील यांनी संभाजीराव काकडे त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना पक्षाचा मार्गदर्शक गेला, अशा शब्दांत आदरांजली वाहिली आहे.

तर नव्या कार्यकर्त्यांना घडविणारे, त्यांना संधी देणारा नेता म्हणजे संभाजीराव काकडे होते, असे प्रदेश जनता दलाचे युवा अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी म्हटले आहे. मुंबई जनता दलाच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनीही आदरांजली वाहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button