माजी खासदार राजू शेट्टींना कोरोनाची लागण

Former MP Raju Shetty infected with corona

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टींना (Raju Shetty) कोरोनाची (Corona Virus) लागण झाली. त्यांच्यावर घरीच डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुर आहेत. काही दिवांपूर्वीच त्यांनी लक्षणे दिसून येताच होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला होता. स्वतः याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली होती.

मागील काही दिवसांपूर्वी ते कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यावेळी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.

मात्र स्कॅन केल्यानंतर फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. शेट्टी यांच्या सोबत त्यांचे स्वीय सहाय्यक यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते सध्या उपचार घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER