हिंमत असेल तर वीज कनेक्शन तोडून दाखवा ; राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा

raju shetti & Uddhav Thackeray

मुंबई : हिंमत असेल तर ऊर्जा मंत्र्यांनी घरगुती वीज कनेक्शन (electricity bill) तोडून दाखवावे, दोन हात करायला आम्हीही तयार आहोत’ असा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju shetti) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला इशारा दिला आहे.

लॉकडाउनच्या (Lockdown) काळात महावितरण (Mahavitaran) कंपनीकडून भरमसाठ वीज बिल होते. परंतु, महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना तातडीने वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येतील, असा इशारा दिला आहे. महावितरणाच्या या भूमिकेवरून राजू शेट्टींनी त्याला प्रत्युत्तर दिली. कोरोना (Corona) लॉकडाउनमधील विज बिल माफ करण्याची मागणी करत वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असे जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER