शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाही : निलेश राणेंचे टीकास्त्र

Nilesh Rane & Uddhav Thackeray

मुंबई : नेहमी मराठी भाषेसाठी आग्रही राहणारे शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारवर मंगळवारी निशाणा साधला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेच्या वापराला दिवाकर रावतेंनी विरोध केला. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दिवाकर रावतेंनी शिवसेनेला घरचा आहेर दिला .

दिवाकर रावतेंच्या याच विधानावरुन भाजपाचे (BJP) खासदार नारायण राणे (Naryane Rane) यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, जुन्या शिवसैनिकांची ठाकरे सरकारमध्ये अवस्था इतकी वाईट झाली आहे की सभागृहात आम्ही मेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार, असे बोलून गेले. उद्धव ठाकरे फक्त ३५ टक्के शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेत सर्व्हे आणि प्रमुख पदासाठी मतदान झालं तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखदेखील राहणार नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी टीका केली आहे.

दरम्यान मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणे चुकीचे आहे, सभागृहात कामकाज सुरु असताना इंग्रजी भाषेचा वापर होतोय, हा प्रकार हास्यास्पद आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकही शब्द व्यक्त करण्यात आला नाही अशी खंत दिवाकर रावतेंनी विधान परिषदेत व्यक्त केली होती. तसेच मी मेल्यावर साहेबांना भेटलो तर मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ? अशी संतप्त भावना दिवाकर रावतेंनी बोलून दाखवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER