माजी आमदार राजीव आवळे राष्ट्रवादीत जाणार

Rajiv Awale-NCP

कोल्हापूर :  हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव आवळे (Rajiv Awale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. आवळे यांच्या प्रवेशानंतर हातकणंगले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार असले तरी महाआघाडीच्या राजकारणात त्यांना कशी संधी मिळणार याबाबत साशंकताच आहे. त्यांच्या प्रवेशानंतर आगामी काळात मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार हे मात्र निश्चित असल्याचे मानले जात आहे.

इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवणारा सर्वात तरूण चेहरा अशी राजीव आवळे यांची ओळख आहे. नगराध्यपदी आरुढ असतानाच त्यांनी वडगांव मतदारसंघाच्या रणांगणात उतरून संपूर्ण राज्याभरातून लक्ष वेधले. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व होते. मात्र त्यांच्या २५ वर्षांच्या एकहाती सत्तेला राजीव आवळे यांनी सुरुंग लावला.

जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर राजीव आवळे आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दरम्यान, कुंभोज मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सौ. स्मिता आवळे या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. त्यामुळे त्यांनी मतदारसंघावर चांगलेच वर्चस्व निर्माण केले. पण शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजीव आवळे यांचा पराभव केल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीला ब्रेक लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER