माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचे निधन

Former MLA Pushpasin Sawant passes away

सावंतवाडी /प्रतिनिधी: कुडाळचे माजी आमदार पुष्पसेन भिवाजी सावंत (79) यांचे शुक्रवारी दुपारी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. कणकवलीहून कुडाळला येत असतांना त्यांना हार्ट ऍटॅक आला. त्यानंतर त्यांना कुडाळला रुग्णालयात हलविण्यात आले होते.

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. पुष्पसेन सावंत यांची आमदारकीची कारकीर्द सिंधुदुर्गवासीयांच्या कायम स्मरणात राहिली. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी थेट रस्त्यावर उतरणारे समाजवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती. एक ट्रक ड्रायव्हर ते आमदार असा त्यांचा प्रवास झाला. त्यांच्या पश्चात पत्नी जि. प. माजी सदस्या आशा सावंत, मुलगे जि. प. सदस्य अमरसेन सावंत, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भूपतसेन सावंत आणि उद्योजक रणजीत सावंत, सुना, नातवंडे असा परिवार आहे.