
नवी मुंबई : माजी आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी अखेर शिवसेनेला (Shivsena) ‘जय महाराष्ट्र’ करण्याची घोषणा केली आहे. नरेंद्र पाटील यांनी शिवसेना उमेदवार म्हणून सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आज एका कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकण्याची घोषणा केली.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दीड वर्षाचा काळ झाला. तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडवू शकले नाहीत. या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीबाबत वेळ मागूनही ते भेटत नाहीत. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी जाहीर केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असून ते शिवसेना नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी शिवसेनेत राहू नये अशीच पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याने आपण नाइलाजास्तव शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला