वयाची ऐंशी पार केलेल्या माजी आमदार महाडिकांनी केली कोरोनावर मात

Mahadevrao Mahadik

कोल्हापूर : वयाची ऐंशी पार केलेले आणि तब्येतीच्या बाबतीत अत्यंत जागरूक असणारे माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी कोरोनामुक्त (Corona) झाले. भाजपचे (BJP) माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांचे ते वडील आणि भाजपचे प्रदेश सदस्य माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे चुकते आहेत.

महाडिक यांना कोरोना जबरदस्त महत्त्वाकांक्षी आणि मुळचे पैलवान असलेल्या महाडिकांनी कोरोनालाही चितपट केले. महाडिक मूळचे पैलवान असल्यामुळे तब्येतीच्या बाबतीत सजग असतात. वेळच्या वेळी जेवण, विश्रांती, व्यायाम यांचे सर्व वेळापत्रक ते चुकवत नाहीत. कोरोनाच्या महामारीत त्यांना कोरोनाची लागण झाली, तसेच त्यांचे समर्थक काहीसे अस्वस्थ झाले; पण महाडिक यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार पुरेशी काळजी घेत कोरोनालाही पिटाळून लावले. राजकारणात अनेक लढाया जिंकणाऱ्या महाडिक यांनी कोरोनाविरुद्धचीही लढाई सहज जिंकली.

कोरोनाच्या काळात त्यांचे वास्तव्य घरातच होते. खाण्याच्याबाबतीत नेहमीप्रमाणे वेळा पाळण्याचा प्रयत्न केला. नियमित व्यायाम केला. पूर्ण झोप घेतली. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव मनावर न आणता सकारात्मक विचार करत मन प्रसन्न राहील याकडे विशेष लक्ष दिल्याचे महाडिक यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER