शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणातून संन्यास

Harshwardhan Jadhav

औरंगाबाद :-२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्याच्या राजकारणातले सर्वांत जास्त चर्चेत राहिलेले नाव म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव. मात्र आज त्यांनी अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या घोषणेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

एक व्हिडीओ संदेश जारी करून त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. नुकताच त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. निवृत्तीची घोषणा करताना ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सुरू आहे. अनेक जण आपापले छंद जोपासत आहेत. मीदेखील माझ्या आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला त्यातून झाली.

म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असं जाधव यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराजयानंतर हर्षवर्धन जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये  प्रवेश केला होता. एकदा मनसे तर एकदा शिवसेनेकडून कन्नड मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. गत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तसंच लोकसभा निवडणुकीतदेखील ते औरंगाबाद लोकसभा क्षेत्रातून मैदानात होते. तिथंही त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यांना २ लाख ७३ हजार २३७ मतं मिळाली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

 

MT LIKE OUR PAGE FOOTER