माजी आमदार बिजलीमल्ल पहिलवान यांचे निधन

Bijali Malla - Sambhaji Pawar - Maharashtra Today

सांगली : माजी आमदार बिजलीमल्ल पहिलवान (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते तीन वेळा जनता दल आणि एक वेळा भाजपातर्फे असे चार वेळा सांगली विधानसभा मतदारसंघातून आमदार निर्वाचित झाले होते.

कुस्ती क्षेत्रात बिजलीमल्ल म्हणून आणि सांगलीच्या राजकीय आखाड्यात वसंतदादा घराण्याचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. कुस्ती क्षणार्धात निकाली लावायची त्यांची खासियत होती. त्यामुळे ते बिजलीमल्ल म्हणून प्रसिद्ध झाले होते.

जनता दलाच्या स्थापनेनंतर वसंतदादा पाटील यांच्या काळात त्यांनी सांगली विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि वसंतदादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर याच पक्षाच्या चिन्हावर त्यानी हॅट्रिक केली. नंतर गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपाच्या (BJP) तिकिटावर याच मतदारसंघातून आमदार झाले.

सहा वर्षांपूर्वी सांगलीतील भाजपाच्या स्थानिक राजकारणातून ते पक्षावर नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला; पण त्यामध्ये यश आले नाही. त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER