राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; असंख्य समर्थकांसह माजी आमदार असिफ शेख यांचा प्रवेश

Asif Sheikh

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने काँग्रेसला (Congress) मोठा धक्का दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख (Asif Sheikh) यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह यांच्या राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश करून मनगटावर घड्याळ बांधले. आसिफ शेख आपल्या असंख्य समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी छगन भुजबळ होते उपस्थित होते.

आसिफ शेख यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम ठोकला होता. आसिफ शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मालेगावातील राजकीय परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. मालेगाव शहरात शेख कुटुंबिय कॉंग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. आसिफ शेख यांचे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहे. मालेगाव महापालिकेत ही काँग्रेस- शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी मात्र विरोधात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER