२४ तासात शिवसेनेचा भाजपाला दुसरा धक्का, मुंबईतील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

hemendra-mehta-joins-shiv-sena

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असताना शिवसेनेनं अवघ्या २४ तासात भाजपला अजून एक धक्का दिला आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलंय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शुक्रवारी माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. आणि आज हेमेंद्र मेहता यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सलग दोन दिवसांत शिवसेनेनं भाजपला दुसरा मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे.

हेमेंद्र मेहता यांचा प्रवेश हा शिवसेनेला फायद्याचा ठरणार आहे. हेमेंद्र मेहता हे बोरिवली पश्चिममधून 3 वेळा आमदार होते. पण भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना विधानसभेला तिकीट देण्यात आलं. त्यावेळी हेमेंद्र मेहता यांनी बंडखोरी केली होती. पुढे मेहता यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एकदा ते भाजपवासी झाले आणि आज अखेर त्यांनी पुन्हा एकदा भाजपला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या गुजराती मतदारांनाशिवसेनेकडे खेचण्यासाठी मेहता यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिवसेनेनं त्यांना प्रवेश दिल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER