माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन

sanjay deotale - Maharastra Today

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मागील काही दिवसांपूसन त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर संजय देवतळे यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी केली होती. यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मागील सहा दिवसांपसून हे उपचार सुरु होते. मात्र, आज अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button