माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा काँग्रेस सोडण्याचा इशारा

Chandrakant Handore

कोल्हापूर :- माजी सामाजिक न्यायमंत्री व भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक चंद्रकांत हंडोरे यांनी काँग्रेस मध्ये गळचेपी होत असल्याने पक्ष सोडण्याचा इशारा दिला.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील माले (ता. पन्हाळा ) येथे जिल्हास्तरीय भिमशक्ती सामाजिक संघटना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीनंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना

हांडोरे म्हणाले, गोरगरिबांवरील अन्याय दूर करण्यासाठी तसेच धर्मांधशक्तीला रोखण्यासाठी गेली 20 वर्षे भिमशक्ती संघटनेचा काँग्रेसला पाठींबा दिला. मात्र निवडणुकीपुरते संघटनेच्या नेत्यांना वापरायचे, आश्वासने द्यायची, नंतर नेत्यांना न विचारण्याची काँग्रेसची भूमिका बरोबर नाही. ते जर भिमशक्ती संघटनेचे प्रश्न सोडवून न्याय देत नसतील, बहुजनांच्या योजनेंची तड लावत नसतील तर स्वतंत्रपणे आपण उभे राहूया. अशा भावना नाशिकच्या राज्यस्तरीय संघटना बैठक व्यक्त झाल्या. तसा तीव्र असंतोषही कार्यकर्त्यांमधून उमटला. गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसने सतत डावलले. त्याबाबत पक्षाला अल्टीमेटम केले असून त्यात सुधारणा झाली नाही तर कार्यकर्त्यांसह आपणासही नक्कीच वेगळा विचार करावा लागेल.

ते पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांचे, बहुजनांचे प्रश्न सोडवणार असतील, भिमशक्तीला सत्तेत वाटा देणार असतील तरच त्यांच्याबरोबर राहू, अन्यता समविचारी पक्षाची सन्मानजनक ऑफर विचारात घेणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी राज्यभर जिल्हावार बैठकीने कल घेऊनच निर्णय घेण्याची महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER