पुण्यात माजी महापौरांनाही मिळाला नाही बेड ! कोरोनाने निधन

- अंतिम संस्कारासाठीही शोधावी लागली स्मशाने !

Dattatraya Ekbote

मुंबई : बेड मिळण्यास दिरंगाई झाल्याने पुण्याचे माजी महापौर दत्तात्रेय एकबोटे (Dattatraya Ekbote) यांचे निधन झाले. दुर्दैव म्हणजे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना स्मशानभूमीत जागा मिळत नव्हती.

त्यांचे शव तीन स्मशानभूमीत फिरवावे लागले. कोरोनाबाबत (Corona) माजी महापौर असलेल्या व्यक्तीची स्थिती अशी असेल तर सामान्य माणसांची किती परवड होत असेल याची कल्पना केलेलीच बरी. दत्तात्रेय एकबोटे यांना बेड मिळावा म्हणून संबंधितांनी अनेक रुग्णालयांकडे चौकशी केली. मात्र बेड मिळू शकला नाही.

अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. योग्य उपचार व्हावेत म्हणून अजित पवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर सुविधा मिळाल्या; पण तोपर्यंत एकबोटे यांची प्रकृती हाताबाहेर गेली होती.

दत्तात्रेय एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास निधन झाले. उल्लेखनीय म्हणजे एकबोटे यांच्या मोठ्या मुलीचे आणि मुलाचेही कोरोनामुळे निधन झाले आहे.

दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी व्हेंटिलेटर आणि डॉक्टरची व्यवस्था असलेली रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही म्हणून कालच रात्री पुण्यातच पत्रकार पांडुरंग रायकर यांचेही  निधन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER