श्रेयवादाच्या लढाईत वीज बिल माफी अडली, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

ntitin Raut & Chandrshekar bavankule

चंद्रपूर : राज्यातील ३ पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईत वीज बिल माफी अडली, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केला. ते म्हणालेत, महाआघाडी सरकारने कोरोना (Corona) काळात वीज बिल माफीची लोकप्रिय घोषणा केली होती. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित पवार (Ajit Pawar) नितीन राऊत (Nitin Raut) यांची फाईल फेटाळत आहेत.

ऊर्जा खात्याला सात – आठ हजार कोटी रुपयांचे अनुदान दिल्याशिवाय वीज बिल माफी शक्य नाही, असे बावनकुळे यांनी लक्षात आणून दिले. सरासरी वीज बिलात दुरुस्ती आणि ४ महिन्यांचे प्रति महिना ३०० रुपये असे एकत्रित १२०० युनिट वीज बिलमाफी देणार या आश्वासनापासून सरकार शब्द फिरवत आहे. राज्यातील नागरिकांना दिलासा न दिल्यास यासाठी भाजपा आंदोलन करेल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER