माजी नगरसेवकाने महापालिकेतील सर्व्हरला झोपले चोपले

मारहाण

कोल्हापूर : माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी आज दुपारी सव्व्हेअर शेटे याला बेदम मारहाण केली.काही दिवसा पूर्वीच नगरसेवक अशोक जाधव यांनी विभागीय कार्यालयातील उप शहर अभियंता रमेश मस्कर यांना दमदाटी केली होती.या प्रकाराच्या निषेधार्थ महापालिकेच्या सर्व अभियंत्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले होते.

या प्रकारावर नुकताच तोडगा निघाला असतानाच नंदकुमार मोरे यांनी सर्व्हेअर शेटे याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने महापालिका अभियंता व कर्मचारी यांच्यात संतापाची लाट उसळली आहे.संबधित सव्व्हेअर याने तक्रार केल्यास उध्या शुक्रवारी काम बंद ठेवण्याचा पवित्रा महापालिका कर्मचारी संघटनेने घेतला असल्याचे समजते.

बहिणीसाठी गणेश ठरला देवदूत

माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आज दुपारी उशिरा महापालिकेच्या राजारामपुरीतील नगररचना कार्यालयात आले.त्यांनी एक बांधकामाची फाइल अडविली असल्याच्या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली.त्यातूनच त्यांनी सव्व्हेंअर शेटे याला बेदम मारहाण केली. मारहाणीत सव्र्हेअरचे कपडे फाटले अन्य कर्मचाऱ्यांनी नंदकुमार मोरे यांच्या तावडीतून सर्व्हेअर शेटे याची सुटका केली.हा प्रकार समजताच महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. नगर रचना विभागातील अभियंता व कर्मचारी यांची तातडीची बैठक उप शहर नगररचनाकार नारायण भोसले यांच्या कक्षात झाली.झाला प्रकार आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांना कळविण्यात आला.त्यांनी संबंधित सर्व्हेअर या पोलिसात तक्रार देण्यास सांगितले तर महापालिका कर्मचारी संघटनेने हीआपल्याकडे लेखी तक्रार देण्यास सांगितले आहे.

माजी नगरसेवक नंदकुमार मोरे हे माजी महापौर सरिता मोरे यांचे पती आहेत त्यांनी या आधीही महापालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ करण्याचे प्रकार घडले आहेत.नगररचना कार्यालयाला त्यांनी एकदा टाळे ही ठोकले होते.त्यांनी केलेल्या सर्व्हेअरला मारहाण प्रकरणी महापालिका प्रशासन व कर्मचारी संघटना कारवाई करणार की दबावा खाली प्रकरण दडपणार याकडे आता लक्ष लागले आहे.