राहुलच्या सभेतील निरुपम, देवरा यांच्या गैरहजरी नाट्याचे पडसाद

congress

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबईत नुकत्याच झालेल्या प्रचारसभेत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम आणि मिलिंद देवरा हे दोघेही गैरहजर होते. आता त्यांचा गैरहजरीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.


मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबईत नुकत्याच झालेल्या प्रचारसभेत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम आणि मिलिंद देवरा हे दोघेही गैरहजर होते. आता त्यांचा गैरहजरीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

संजय निरुपम यांनी याबाबत ट्विट करून सांगितले की या सभेला व्यक्तिगत कारणामुळे मी हजर राहू शकणार नाही, हे आधीच कळवले होते. निरुपम यांनी म्हटले आहे की – “राहुल गांधी यांच्या रॅलीतील माझ्या अनुपस्थितीबद्दल सुरू असलेल्या चर्चा अर्थहीन आहेत. अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे मी संपूर्ण दिवस व्यस्त होतो. यासंदर्भात मी राहुल गांधी यांना आधीच माहिती दिली होती. राहुल गांधी हे माझे नेते आहेत आणि कायम राहतील.”

या ट्विटमध्ये निरुपम यांनी पुढे म्हटले आहे की – ‘निकम्मा’ या रॅलीला का अनुपस्थित होता?’ यात निरुपम यांनी ‘निकम्मा’ कोणाला म्हटले याची चर्चा सुरू आहे. काही लोकं ‘निकम्मा’ याचा संबंध मिलिंद देवरा यांच्याशी जोडत आहेत त्यामुळे चर्चा खळबळजनक झाली आहे.

दरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी – कोणीही पक्षविरोधी भूमिका न स्वीकारता आणि कोणत्याही वाद न घालता एकत्रित मिळून पक्षासाठी काम करावं, अशी समज कुणाचेही नाव न घेता निरुपम आणि देवरा यांना दिली आहे.