काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

Eknath Gaikwad

मुंबई :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) हे माजी खासदार तसेच मुंबईचे काँग्रेसचे प्रभारी राहिले आहेत. त्याचबरोबर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचे ते वडील होते.

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी १० वाजता त्यांचे कोरोनामुळे दु:खद निधन झाले. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.

राजकीय कारकीर्द
एकनाथ गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. राज्य मंत्रिमंडळात ते मंत्रीदेखील होते. एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला. दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा ते निवडूनदेखील आले. मात्र, शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता. एकनाथ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button